यात्रास्थळ विकास कार्यक्रम

यात्रास्थळ विकास कार्यक्रमा अंतर्गत जिल्हयातील क वर्ग दर्जा असणा-या यात्रा स्थळांच्या ठिकाणी यात्रेच्या वेळी येणा-या भाविकासाठी सोई सुविधा उपलब्ध करुन देणे

यात भक्त निवास बांधणे,वाहनतळ बांधणे, स्त्री/पुरष शौचालय बांधणे, पाणी पुरवठा सोय, दिवाबत्ती सोय, संरक्षकभित बांधणे या कामांचा समावेश आहे.


योजनेत सहभागाच्या अटी/शर्ती/पात्रता ---

१) विहीत प्रपत्रात माहिती

२) प्रशासकिय मान्यता

३) तांत्रिक मान्यता

४) अंदाजपत्रक व आराखडे नकाशे

५) देखभाल दुरुस्ती/ग्रामपंचायत हमीपत्रक व ग्रामपंचायत ठराव

६) तीर्थक्षेत्र क वर्ग मान्यतेचा आदेश तीर्थक्षेत्राचा दर्जा

७) ज्या जागेवर बांधकाम करावयाचे आहे तेथील ७/१२ उतारा अथवा नमुना ८ जागेचा उतारा जागा

८) जागा संस्थेची/ खाजगी मालकीची असल्यास १०० रुपयाचा स्टॅम्प पेपरवर सदरहु जागा ग्रा.प./जि.प. ला हस्तातंरीत करण्यात बाबतचे संबधितांचे संमतीपत्रक

९) प्रस्तुत काम हे अन्य योजनेतुन प्रस्तावित किवा मंजुर नसल्या बाबत दाखला प्रमाणपत्र

१०) प्रस्तावित जागेचा स्थळदर्शक नकाशा

११) गट विकास अधिकारी यांचे शिफारसशी सह प्रस्ताव ग्रा.प. विभाग जि.प कडे सादर करण्यात यावा.


- - -
ग्राम पंचायतींना जन सुविधा योजने अंतर्गत विशेष अनुदान

जन सुविधा योजने अंतर्गत

(अ) ग्रामिण भागात दहन/ दफन भुमीची व्यवस्था करणे त्या सुस्थितीत ठेवणे व त्यांचे नियमन करणे यासाठी स्मशानभुमीवर हाती घ्यावयाची कामे दहन/दफन भुमी भुसंपादन,चबुत-यांचे बांधकाम,पोहोच रस्ता,गरजे नुसार कुंपन व भिती घालणे, विद्युतीकरण, आवश्यकते नुसार विद्युत दाहिनी, पाण्याची सोय, स्मृती उद्यान, स्मशान घाट जमिन सपाटीकरण व तळफरशी

(ब) ग्रामपंचायत भवन/ कार्यालय बांधकामे. यात ज्या गावांमध्ये ग्रा.प.इमारत नाही अश्या ठिकाणी सदर योजने अंतर्गत नवीन इमारत बांधकाम प्राधान्यााने हाती घेण्यात यावे. या शिवाय जुन्या पडझड झालेल्या ग्रा.प. इमारतीची पुर्नरबांधणी अथवा विस्तार करणे, इमारती भोवती कुपंण घालणे, आवारामध्ये वृक्षारोपण करणे परिसर सुधारणा करणे


योजनेत सहभागाच्या अटी/शर्ती/पात्रता

१) या योजने अंतर्गत प्रत्येक कामास प्रशासकिय मान्यता ग्रामसभेच्या सहमती नंतर ग्रा.प. मार्फत घेण्यात यावी.

२) तांत्रिक मान्यता सक्षम अधिका-या मार्फत घेण्यात यावी.

३) अंदाजपत्रक व आराखडे नकाशे

४) देखभाल दुरुस्ती/ग्रामपंचायत हमीपत्रक व ग्रामपंचायत ठराव

५) सदर योजने अंतर्गत कामांची निवड जिल्हा नियोजन समिती मार्फत करण्यात येईल.

६) ज्या जागेवर बांधकाम करावयाचे आहे तेथील ७/१२ उतारा अथवा नमुना ८ जागेचा उतारा जागा

७) प्रस्तुत काम हे अन्य योजनेतुन प्रस्तावित किवा मंजुर नसल्या बाबत दाखला प्रमाणपत्र

८) प्रस्तावित जागेचा स्थळदर्शक नकाशा

९) गट विकास अधिकारी यांचे शिफारसशी सह प्रस्ताव ग्रा.प. विभाग जि.प कडे सादर करण्यात यावा.

- - -

मोठया ग्राम पंचायतींना नागरी सुविधा साठी विशेष अनुदान पुरविणे

मोठया ग्रामपंचायतींना नागरी सुविधासाठी विशेष अनुदान या योजने अंतर्गत बाजारपेठ विकास, सार्वजनिक दिबाबत्तीची सोय,बागबगीचे, उद्याने तयार करणे, अभ्यासकेंद्र, गांवअंतर्गत रस्ते करणे व सांडपाणी व्यवस्थापनासाठी भुमीगत नाल्याचे बांधकाम करणे


योजनेत सहभागाच्या अटी/शर्ती/पात्रता

१) पर्यावरण संतुलितसमृध्द ग्राम योजनेत २०११ च्या जनगणने नुसार ५००० वरील लोकसंख्येच्या पात्र ग्रामपचायतीचे आराखडे शासन मान्य संस्थे कडुन करुन घेणेत यावे.

२) तांत्रिक मान्यता सक्षम अधिका-या मार्फत घेण्यात यावी.

३) अंदाजपत्रक व आराखडे नकाशे

४) देखभाल दुरुस्ती/ग्रामपंचायत हमीपत्रक व ग्रामपंचायत ठराव

५) जिल्हयातील ग्रा.प.चा प्राधान्य क्रम ठरविण्याचा अधिकार जिल्हा नियोजन मंडळाकडे असेल ज्या ग्रा.प.ची लोकसंख्या ५००० च्या वर आहेत व ज्या ग्रामपंचायती पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजनेत सहभागी होवुन त्या योजनेच्या निकषाची पुर्तता केली असेल त्यामधुनच जिल्हा नियोजन मंडळ प्राधान्यक्रम ठरविल.

६) ज्या जागेवर बांधकाम करावयाचे आहे तेथील ७/१२ उतारा अथवा नमुना ८ जागेचा उतारा जागा

७) प्रस्तुत काम हे अन्य योजनेतुन प्रस्तावित किवा मंजुर नसल्या बाबत दाखला प्रमाणपत्र

८) प्रस्तावित जागेचा स्थळदर्शक नकाशा

९) गट विकास अधिकारी यांचे शिफारसशी सह प्रस्ताव ग्रा.प. विभाग जि.प कडे सादर करण्यात यावा.

- - -

मा.लोक प्रतिनिधीनी सुचविलेल्या ग्रामिण भागातील गावांतर्गत रस्ते गटारे व अन्य मुलभुत सुविधा पुरविणे मुलभुत सुविधा


योजने अंतर्गत गावांतर्गत रस्ते, गटारे, पाऊसपाणी निचरा,दहनभुमी व दफनभुमीची सुधारणा करणे, संरक्षकभित ,ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे, आठवडे बाजारासाठी सुविधा, गावांमध्ये कचरा डेपोसाठी व प्राथमिक प्रक्रियेसाठी सुविधा, सार्वजनिक जागेत वृक्ष लागवड व त्यांचे संरक्षण


योजनेत सहभागाच्या अटी/शर्ती/पात्रता

१) तांत्रिक मान्यता सक्षम अधिका-या मार्फत घेण्यात यावी.

२) अंदाजपत्रक व आराखडे नकाशे

३) देखभाल दुरुस्ती/ग्रामपंचायत हमीपत्रक व ग्रामपंचायत ठराव

४) ज्या जागेवर बांधकाम करावयाचे आहे तेथील ७/१२ उतारा अथवा नमुना ८ जागेचा उतारा जागा

५) प्रस्तुत काम हे अन्य योजनेतुन प्रस्तावित किवा मंजुर नसल्या बाबत दाखला प्रमाणपत्र

सदर योजने अंतर्गत काम सुचविणे बाबत लोक प्रतिनिधी यांचे शिफारस पत्र

७) प्रस्तावित जागेचा स्थळदर्शक नकाशा

८) सदर प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत.

- - -

राजीव गांधी पंचायत सक्षमीकरण अभियान (RGPSA) अंतर्गत ग्रा.प. कार्यालय बांधणे


राजीव गांधी पंचायत सक्षमीकरण अभियान योजने अंतर्गत ज्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय नाही अश्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधणे सदर योजनेसाठी केंद्र हिस्सा ७५ % व राज्य हिस्सा २५ % या प्रमाणे रु.१२.०० लक्ष पर्यंत अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते.


योजनेत सहभागाच्या अटी/शर्ती/पात्रता

१) तांत्रिक मान्यता सक्षम अधिका-या मार्फत घेण्यात यावी.

२) अंदाजपत्रक व आराखडे नकाशे

३) देखभाल दुरुस्ती/ग्रामपंचायत हमीपत्रक व ग्रामपंचायत ठराव

४) ज्या जागेवर बांधकाम करावयाचे आहे तेथील ७/१२ उतारा अथवा नमुना ८ जागेचा उतारा जागा

५) प्रस्तुत काम हे अन्य योजनेतुन प्रस्तावित किवा मंजुर नसल्या बाबत दाखला प्रमाणपत्र

६) प्रस्तावित जागेचा स्थळदर्शक नकाशा

७) गट विकास अधिकारी यांचे शिफारसशी सह प्रस्ताव ग्रा.प. विभाग जि.प.  कडे सादर करण्यात यावा

- - -


.पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना

१) महाराष्ट्र शासन,ग्रामविकास व जलसंधारण विभाग,शासन निर्णय क्र.व्हीपीएम/२६१०/ प्र.क्र.१ /पंरा-४ मंत्रालय दि.१८ ऑगस्ट २०१०

२) महाराष्ट्र शासन,ग्रामविकास व जलसंधारण विभाग,शासन निर्णय क्र.व्हीपीएम/२६१४/प्र.क्र.३४ /पंरा-४ मंत्रालय दि.१३ जुन, २०१४

योजनेचा उददेश :- लोकसहभागातून चांगल्या प्रकारच्या शासन सहकार्याने उच्च प्रतीच्या मुलभूत सुविधांचा हा कार्यक्रम आहे. पर्यावरणाचे संवर्धन,जतन व संरक्षण करणे ,राज्य शासनाच्या विविध योजनांची सांगड घालून समन्वय करणे , ग्रामीण भागात शहरी भागाप्रमाणे सुविधा निर्माण करणे इ. हा या योजनेचा उद्येश आहे.

ही एक अत्यंत महत्तवाची योजना असुन सर्वांनी यात सहभागी होणे गरजेचे आहे.


- - -


ई-पंचायत (संग्राम - संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र) प्रकल्‍पाविषयी थोडक्‍यात

भारत निर्माण कार्यक्रमातील नॅशनल गव्‍हर्नन्‍स कार्यक्रमांतर्गत सर्व पंचायतराज संस्‍थाचे संगणकीकरण करुन त्‍यांच्‍या कारभारात एकसुत्रता व पारदर्शकता आणण्‍यासाठी ईपीआरआय/ईपंचायत हा मिशन मोड प्रकल्‍प हाती घेणेत आलेला आहे.

महाराष्‍ट्रातील सर्व पंचायतराज संस्‍थांचे) जिल्‍हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत (संगणकीकरण करुन त्‍यांचा कारभार ऑनलाईन करण्‍याचा महत्‍वाकांक्षी संगणकीय ग्रामीण महाराष्‍ट्र ) संग्रामहा प्रकल्‍प राबविण्यात येत आहे.

प्रकल्‍प अंमलबजावणी करिता महाऑनलाईन लिमिटेड या महाराष्‍ट्र शासन व टीसीएस या राज्‍यशासन अंगीभूत कंपनीची नेमणुक करणेत आलेली आहे.
महाराष्‍ट्रात हा प्रकल्‍प सं.ग्रा.म (संगणकीयग्रामीण महाराष्‍ट्र) या नावाने राबविणेत येत आहे.
शासन निर्णय मार्गदर्शक सुचनांनुसार दि. २६ व ३० एप्रील २०११.दि. ०१मे२०११रोजीकळंबोलीजि .रायगड येथे ई पंचायत प्रकल्‍पाच्‍या अंमलबजावणीचा शुभारंभ करणेत आला.

ई-पंचायत (संग्राम - संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र) प्रकल्‍पाची उद्दिष्‍टये

सर्व पंचायत राज संस्थांचा कारभार ऑनलाईन करणे.
सर्व पंचायत राज संस्थांचा कोष (Database) तयार करणे.
ई-पंचायत सुटमधील11आज्ञावलींमध्ये माहिती भरणे.
गावोगावी ग्रामसेवा केंद्रांच्‍या माध्‍यमातुन संगणक प्रशिक्षण देणे.
ग्रामीण भागातील तांत्रिक मनुष्‍यबळ सक्षम करणे.
ग्रामीण भागात संगणक प्रणाली मार्फत व्‍यावसायिक सुविधा पोहचविणे.
राज्‍यातील सर्व ग्रामपंचायतींमध्‍ये ग्रामसेवा केंद्र स्‍थापन करुन नागरिकांना विविध सुविधा, दाखले त्‍यांचे रहिवासी क्षेत्रात उपलब्‍ध करुन देणे.
या प्रकल्पाच्या समन्वयाने नागरिकांना ग्रामीण भागात देण्यात येणा-या सर्व सुविधांचा दर्जा उंचविणे.

ग्रामपंचायत विभाग