सदर पशुवैद्दकीय दवाखान्यांमधुन पशुधनावर उपचार केले जातात.

जिल्हयातील पशुवैद्दकीय संस्थांमार्फत नाममात्र सेवाशुल्क आकारून खालीलप्रमाणे पशुवैद्दकीय सेवा पुरविण्यात येतात


शासन निर्णय ११ ऑक्टोंबर २०१० अन्वये जिल्हा परिषदेकडील पशुवैद्दकीय दवाखान्यामार्फत जमा झालेल्या सेवाशुल्काच्या रकमेपैकी कृत्रिम रेतन कार्याचे सेवाशुल्क वगळुन ऊर्वरीत १०० टक्के सेवाशुल्काची रक्कम पशुवैद्दकीय दवाखान्याच्या बळकटीकरणासाठी जिल्हा परिषदेकडे जमा करणेस मंजुरी प्राप्त झाली असुन सदर सेवाशुल्काचा विनियोग संबंधीत पशुवैद्दकीय दवाखान्याचा बळकटीकरणासाठी करणेत येणार आहे. कृत्रिम रेतन जिल्हयातील पशुवैद्दकीय संस्थांना कृत्रिम रेतनाकरीता महाराष्ट्र पशुधन विकास मंडळामार्फत विर्यमात्रांचा पुरवठा केला जातो.टिपः- कृत्रिम रेतनाव्दारे संकरीकरणाचे प्रमाण ६२.५ टक्के चे मर्यादेत ठेवल्याने जनावरांची प्रतीकारशक्ती चांगली राहते. कृत्रिम रेतनाकरीता शेतक-यांनी नजिकच्या पशुवैदयकीय दवाखान्याशी संपर्क करावा. कृत्रिम रेतनाकरीता महाराष्ट्र पशुधन विकास मंडळामार्फत पुरवठा केलेल्या रेतमात्राचा उपयोग करावा.


योजना 


नंदुरबार जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०१०-११ मध्ये राबविण्यात आलेल्या योजना खालील प्रमाणे आहेत. सदरच्या योजनांची नावे योजनेचे स्वरूप आभार्थी निवडीचे निकष दर्शविणारे विवरणपत्र.


) बिगर आदिवासी सर्वसाधारण योजनाः-

. वैरण विकास योजनाः- कमीतकमी १० गुंठे क्षेत्रावर रू. ६०० च्या मर्यादेत १०० टक्के अनुदानावर वैरणीचे बियाणे देण्यात येते. सर्व साधारण लाभार्थी अल्पभुधारक असावा. स्वतःची जनावरे असावीत, लाभार्थ्यास दि. ---२००१ नंतर दोनपेक्षा जास्त ह्यात अपत्य नसावी.


) आदिवासी उपयोजना (टि.एस.पी.) -

.वैरण विकास योजनाः- कमीतकमी १० गुंठे क्षेत्रावर रू. ६०० च्या मर्यादेत १०० टक्के अनुदानावर वैरणीचे बियाणे देण्यात येते. सर्व साधारण लाभार्थी अल्पभुधारक असावा. स्वतःची जनावरे असावीत, लाभार्थ्यास दि. ---२००१ नंतर दोनपेक्षा जास्त ह्यात अपत्य नसावी.

. खाद्य अनुदानः- लाभार्थीकडील दुधाळजनावरांच्या भाकड काळासाठी म्हशीकरीता २२५ किलो तर गायींसाठी १५० किलो पशुखाद्य १०० टक्के अनुदानावर वाटप करणे. लाभार्थीकडील शासकीय योजनाव्दारे पुरवठा केलेल्या दुधाळ जनावरांना प्राधान्याने तसेच लाभार्थी कडील स्वतःच्या दुधाळ जनावरांच्या भाकड काळासाठी पशुखाद्य देण्यात यावे. लाभार्थी अनुसुचित जमातीचा असावा. लाभार्थीमध्ये ३३ टक्के महिला लाभार्थी असाव्यात. लाभार्थ्यास दि. //२००१ नंतर दोन पेक्षा जास्त ह्यात अपत्य नसावीत.


) आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी उपयोजना (.टी.एस.पी.) -

. खाद्य अनुदानः- लाभार्थीकडील दुधाळजनावरांच्या भाकड काळासाठी म्हशीकरीता २२५ किलो तर गायींसाठी १५० किलो पशुखाद्य १०० टक्के अनुदानावर वाटप करणे. लाभार्थीकडील शासकीय योजनाव्दारे पुरवठा केलेल्या दुधाळ जनावरांना प्राधान्याने तसेच लाभार्थी कडील स्वतःच्या दुधाळ जनावरांच्या भाकड काळासाठी पशुखाद्य देण्यात यावे. लाभार्थी अनुसुचित जमातीचा असावा. लाभार्थीमध्ये ३३ टक्के महिला लाभार्थी असाव्यात. लाभार्थ्यास दि. //२००१ नंतर दोन पेक्षा जास्त ह्यात अपत्य नसावीत.


) अनुसुचित जाती उपयोजना (एस.सी.पी) -

. दुधाळ जनावरांचे गट वाटपः- लाभार्थ्यास दोन गाई/म्हशीचा गट प्रति गाय/म्हैस रूपये ४००००/- किंमती प्रमाणे रूपये ८००००/- व ५.७५ टक्के सेवा दर या दराने तीन वर्षाचा विमा रूपये ५०६१/- असे एकुण ८५०६१/- प्रमाणे या योजनेअंतर्गत अनुसुचित जाती/जमातीच्या लाभार्थ्यास २ दुधाळ जनावरांचा एक गट वाटप करतांना ७५ टक्के म्हणजेच रूपये ६३७९६/- शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील. व अनुदाना व्यतिरिक्त उर्वरित २५ टक्के रक्कम स्वतः उभारावी लागेल बँक/वित्तीय संस्थेकडुन कर्ज घेणा-या (५ टक्के लाभार्थी हिस्सा व २० टक्के बँकेचे कर्ज) लाभार्थ्यास या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येते.

लाभार्थी अनुसुचित जाती नवबौध्द शक्यतो ज्या गावातून लाभार्थ्यांची निवड करावयाची आहे. ते गांव दुध संकलन मार्गावर (त्या गावात दुध संकलन होऊन त्याच्या विपणनाची सोय/त्या गावात दुध डेअरी कार्यान्वीत असेल अशा गावातून) असावे. लाभार्थी निवडीची मुभा असल्यास तथापि वरील परिस्थिती नसलेल्या गावात ५ लाभार्थ्यांचा गट असणे आवश्यक आहे. लाभार्थी २५ टक्के स्वहिस्सा रोख भरणारा असावा. लाभार्थी मध्ये ३३ टक्के असाव्यात लाभार्थ्यांस दि. //२०११ नंतर दोन पेक्षा जास्त ह्यात अपत्य नसावीत.

.पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षणः- सदरचे पशुसंवर्धन विषयक ३ दिवसाचे प्रशिक्षण तालुका स्तरावर आयोजित करून प्रति लाभार्थी दैनंदिन भत्ता रू.१०० प्रमाणे ३ दिवसाचे रू.३०० (चहा, नास्ता, जेवन इ.) प्रशिक्षण केंद्रावर येण्या-जाण्याकरीता प्रत्यक्ष खर्च रू.१०० चे मर्यादेपर्यंत. प्रशिक्षण साहित्य करीता पेन,रजिस्टर, प्रचार साहित्यसाठी रू. १०० प्रशिक्षण कालावधी दृकश्राव्य व्यवस्था, प्रचार, बँनर्स, चार्टस् इ. करीता रू. ५०० याप्रमाणे प्रति लाभार्थ्यास एकूण रू. १००० रक्कम खर्च करावी.) लाभार्थ्यास लिहिता वाचता येणे आवश्यक आहे. (साक्षर असावा.) लाभार्थी अनुसुचित जाती नवबौध्द असावा लाभार्थ्यामध्ये ३३ टक्के महिला असाव्यात. लाभार्थ्यास दिनांक. //२००१ नंतर २ पेक्षा जास्त ह्यात अपत्य नसावीत.

. खाद्य अनुदानः- लाभार्थीकडील दुधाळजनावरांच्या भाकड काळासाठी म्हशीकरीता २२५ किलो तर गायींसाठी १५० किलो पशुखाद्य १०० टक्के अनुदानावर वाटप करणे. लाभार्थीकडील शासकीय योजनाव्दारे पुरवठा केलेल्या दुधाळ जनावरांचा प्राधान्याने तसेच लाभार्थी कडील स्वतःच्या दुधाळ जनावरांच्या भाकड काळासाठी पशुखाद्य देण्यात यावे. लाभार्थी अनुसुचित जाती नवबौध्द असावा. लाभार्थीमध्ये ३३ टक्के महिला असाव्यात. लाभार्थ्यास दिनांक. //२००१ नंतर २ पेक्षा जास्त ह्यात अपत्य नसावीत.

. शेळ्यांचे गट वाटपः- १ बोकड अधिक १० शेळ्या ७५ टक्के अनुदान व २५ टक्के वित्तीय संस्थांचे कर्ज अथवा लाभार्थ्याचा नगदी हिस्सा. प्रति बोकड रू. ५०००/- व प्रतिशेळी रू. ४०००/- या प्रमाणे १० शेळ्यांची किंमत ४००००/- विमा अनुदान ५.७५ टक्के + १०.०३ टक्के सेवाकर या दराने ३ वर्षाकरीता रू. २८४८. लाभार्थ्यास १ बोकड+१० शेळींचा एक गट वाटप करताना ७५ टक्के म्हणजेच रू. ३५८८६/- शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील. व अनुदाना व्यतिरिक्त उर्वरित २५ टक्के रक्कम स्वतःउभारावी लागेल बँक/ वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणा-या (५ टक्के लाभार्थी हिस्सा व २० टक्के बँकेचे कर्ज) लाभार्थ्यास या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येते. लाभार्थी अनुसुचित जाती नवबौध्द असावा. लाभार्थीमध्ये ३३ टक्के महिला लाभार्थी असाव्यात. लाभार्थ्यास दि. //२००१ नंतर दोन पेक्षा जास्त ह्यात अपत्य नसावीत.

. जंतनाशके पाजणेः- अनुसुचित जातीच्या लाभार्थ्यांकडील पशुधनास जंतनाशके पाजणे, क्षार मिश्रणे पुरविणे व परजिवी किटकांचे नियंत्रण करण्यासाठी औषधीपुरवठा करणे. सदरचे योजनाअंतर्गत अनुसुचित जातीच्या लाभधारकाकडील शेंळ्या व कोंबड्यांना जंतनाशके क्षारमिश्रणे पुरविणे व परजिवी किटकांचे जनावरे, शेळ्या, मेंढ्या व कोंबड्या इ. पशुधन असावेत.


Animal Husbundry Department

अ. क्र.संस्था संख्या कार्यरत ठिकाण 
१ पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय १ नंदुरबार 
२ तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय ४ नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा 
३ पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी - २ १४ -


पशुसंवर्धन विभाग

Nandurbar Zilla Parishad
नंदुरबार जिल्हयाचे एकुण भौगोलिक क्षेत्रफळ ५०३४.३३ चौ. किलोमीटर असून राज्याच्या एकुण क्षेत्रापैकी १.६२ टक्के व्यापलेल्या या जिल्हयाचा राज्याचा एकुण क्षेत्रफळाचा विचार करता ३१ वा क्रमांक आहे. जिल्हयातील एकुण ९४७ गावे ६ तालुक्यामध्ये सामावलेली आहेत. जिल्हयाचे हवामान उष्ण व कोरडे असुन पावसाळा व हिवाळा ऋतू वगवळता सामान्यतः उष्ण आहे. जिल्हयातील जमीन हलकी, मध्यम प्रतिची व काळी कसदार सरासरी १० ते ६५ फुटापर्यंत आहे. जिल्हयाचे सुमारे ३ लक्ष हेक्टर भाग जंगलक्षेत्राने व्यापलेला आहे.

    नंदुरबार जिल्हा हा सातपुडा डोंगराळ रांगेतील मोठया प्रमाणात दुर्गम क्षेत्र असलेला आहे. जिल्हयातील धडगांव, अक्कलकुवा व तळोदा या तालुक्यांचा या क्षेत्रात प्रामुख्याने समावेश होतो. नंदुरबार जिल्हयात साधारणपणे ७५ टक्के अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे. त्यादृष्टीने राज्यात सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या म्हणून प्रथम क्रमांकावर आहे.

   ग्रामीण भागातील शेतकरी अल्पभुधारक शेतमजुर, दारिद्रय रेषेखालील कुटुंबे यांच्यासाठी दुग्ध व्यवसाय महत्वाचा व्यवसाय आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागामार्फत दुग्धव्यवसाय, शेळीपालन व कुक्कुटपालन व्यवसाय वाढीसाठी कालबध्द नियोजन करणेत येत आहे. जिल्हयामध्ये होलस्टीन फ्रेजीयन व जर्सी जातीच्या संकरीत गायी तसेच गावठी गाई आहेत. गिर, मेहसाणा, थारपारकर, सुरती, जाफराबादी व मु-हा या म्हशीच्या जाती प्रामुख्याने आहेत. या जातीमधील दुधाचे प्रमाण चांगले आहेत


जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत ग्रामीण भागातील पशुपालकांना पशु पशुवैद्दकीय सेवा उपलब्ध करुन देण्याकरीता श्रेणी-१ चे ४९ व श्रेणी-२ चे ३६ असे एकूण ८५ पशुवैद्दकीय दवाखाने  कार्यरत आहेत.


सदर पशुवैद्दकीय दवाखानामधुन पशुधनावर उपचार केले जाते. तसेच नंदुरबार येथे एक फिरता पशुवैद्दकीय दवाखाना कार्यरत असुन त्याव्दारे आदिवासी भागामधील / गावांमधील पशुधनावर प्रत्यक्ष उपचार केले जाते. पंचायत समिती स्तरावर पशुधन विकास अधिकारी (विस्तार) हे तालुका समन्वयक अधिकारी म्हणून काम करीत असतात. नंदुरबार जिल्हयामध्ये राज्य शासनामार्फत खालील प्रमाणे राज्यस्तरीय संस्था कार्यरत आहे.