सहाय्यक शासकीय माहीती अधिकारी, माहीती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांची यादी 

माहितीचा अधिकार 

कार्यालयाचे नांव
सहाय्यक शासकीय माहीती अधिकारी
माहीती अधिकारी
अपिलीय अधिकारी
दुरध्‍वनी क्रमांक
सामान्य प्रशासन विभाग कार्यालयीन अधिक्षक कक्ष अधिकारी उप मु.का.अ. (सा.प्र.वि.)०२५६४-२१०२२२
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणावरिष्ठ सहाय्यकसहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रकल्प संचालक०२५६४-२१००९०
अर्थ विभागलेखाधिकारी वरिष्ठ लेखाधिकारीमुख्य लेखा व वित्त अधिकारी०२५६४-२१०२३१
ग्रामपंचायत विभागकार्यालयीन अधीक्षकग.वि.अ. (म.ग्रा.रो.ह.यो)उप मु.का.अ. (ग्रा.पं.)
०२५६४-२१०२२६
महिला व बालकल्याण विभागकार्यालयीन अधीक्षक
कक्ष अधिकारी उप मु.का.अ. (म.व बा.)०२५६४-२१०२२७
आरोग्य विभागकक्ष अधिकारी प्रशासन अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी ०२५६४-२१०२३५
कृषी विभागकक्ष अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी कृषी विकास अधिकारी ०२५६४-२१०२३७
पशुसंवर्धन विभागकक्ष अधिकारी पशुधन विकास अधिकारी (तां.)जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी ०२५६४-२१०२३६
समाज कल्याण विभागवरिष्ठ सहाय्यक कार्यालयीन अधिक्षक वर्ग-२ समाज कल्याण अधिकारी ०२५६४-२१०२३८
बांधकाम विभागकार्यालयीन अधिक्षक वरिष्ठ शाखा अभियंता कार्यकारी अभियंता (बांधकाम विभाग)०२५६४-२१०२३३
लघुसिंचन विभागकार्यालयीन अधिक्षक 
वरिष्ठ शाखा अभियंता 
कार्यकारी अभियंता (लघुसिंचन विभाग)
०२५६४-२१०२३४
ग्रामीण पाणीपुरवठा विभागकार्यालयीन अधिक्षक 
वरिष्ठ शाखा अभियंता 
कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा विभाग)
०२५६४-२१०२३९
शिक्षण विभाग (माध्यमिक)कार्यालयीन अधिक्षक उपशिक्षणाधिकारी (माध्य.)शिक्षणाधिकारी (माध्य.)०२५६४-२१०२३०
शिक्षण विभाग (प्राथमिक)कार्यालयीन अधिक्षक
उपशिक्षणाधिकारी (प्राथ.)
शिक्षणाधिकारी (प्राथ.)
०२५६४-२१०२४०
भूजल सर्वेक्षण विकास विभागकनिष्ठ अभियंता शाखा अभियंता उप अभियंता (यांत्रीकी)


प्रस्तावना
माहितीचा अधिकार अधिनियम - २००५ या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे शासकीय / निमशासकीय यंत्रणांवर चांगले नियंत्रण आले आहे. तसेच या कायद्यामुळे शासकीय कामकाज कसे होत आहे, शासनाच्या जनकल्याणाच्या विविध योजनांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते, त्यातील विविध स्तरावरील टप्पे / प्रक्रिया याचीही माहिती सर्व सामान्य जनतेला खुली होणार आहे. तसेच शासनाचा कारभार जसजसा पारदर्शक होत जाईल तसतशी जनतेच्या मनातील संदिग्धता कमी होत जाईल. तसेच दप्तर दिरंगाई आणि भ्रष्टाचार यालाही आपोआपच आळा बसेल.

या अधिकारात खालील बाबींचा समावेश आहे:

 • काम, कागदपत्रे, नोंदी यांची तपासणी करणे.
 • कागदपत्रे किंवा नोंदी यांच्या प्रमाणित प्रती मिळवणे तसेच त्यांची टिपणे काढणे.
 • साहित्याच्या प्रमाणित प्रती मिळवणे.
 • माहिती छापील प्रत (प्रिंटआऊटस्), सीडी, फ्लॉपी, टेप्स, व्हिडिओ रेकॉर्डस् किंवा इतर कोणत्याही ईलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मिळवणे.


या कायद्यात माहिती नेमकी कोणत्या स्वरुपाची घेता येते?

माहितीचा अधिकार म्हणजे कोणत्याही शासकीय, निमशासकीय, अनुदानित कार्यालयाकडे असलेली किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली असलेली व या नियमानुसार मिळवता येण्याजोगी माहिती. आवश्यक अशी माहिती जाणून घेणे, त्याची कागदपत्रे मिळवणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असून तो मूलभूत अधिकार आहे. असा हा अधिकार २००५ या वर्षामध्ये सर्वांनाच मिळाला आहे. 

या अधिकाराचा वापर करुन परिसरात सुरु असलेल्या कामांची माहिती घेता येते. उदा. कार्यालयाचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, कार्यालयाची वेळ, जनमाहिती अधिकार्‍यांची नावे, कार्यालयाची कामकाजाची पद्धत, उद्दिष्टे, कार्यालयात उपलब्ध असलेली माहिती, विविध अर्जांचे नमुने, कर्मचार्‍यांची नावे व इतर माहिती, उपलब्ध निधी, लाभार्थ्यांची यादी, योजनांची माहिती, योजनांवर अथवा लाभार्थ्यांवर झालेला खर्च, परिपत्रके, उपलब्ध प्रकाशने व त्याची किंमत, कर्मचार्‍यांचे वेतन, अंदाजपत्रक अशा प्रकारची माहिती घेता येते.


जन माहिती अधिकारी म्हणजे कोण?
हे अधिकारी सर्व प्रशासकीय खात्यांत किंवा कार्यालयांत सार्वजनिक अधिकाऱ्यांद्वारे नेमण्यात आलेले असतात. ते नागरीकांना त्यांनी मागितलेल्या आवश्यक माहितीनुसार माहिती देण्याचे काम करतात. या कामासाठी जर ते सहाय्यकाची मदत घेत असतील तर अशा व्यक्तीसही जन माहिती अधिकारी म्हणुन वागवले जाते.


कोणाकडून माहिती घेता येणार नाही?
राष्ट्राच्या संरक्षणाच्या दॄष्टीने संवेदनाशील क्षेत्र, व्यक्तीगत स्वरुपाची, खाजगी कंपनी, विनाअनूदानीत संस्था, खाजगी विद्यूत पुरवठादार कंपनी, इ. कडून या कायद्याच्या आधारे माहिती मागता येत नाही. तसेच

 • अशी कोणतीही माहिती ज्यामुळे भारताची सार्वभौमता आणि एकात्मता, सुरक्षा, वैज्ञानिक किंवा आर्थिक बाबी, परराष्ट्रीय संबंध आदींना धोका पोहोचणार असेल किंवा ज्यामुळे एखाद्या गुन्ह्याला प्रोत्साहन मिळू शकते.
 • अशी माहिती जी कि कोणत्याही न्यायालयाने प्रसिद्ध करण्यास नकार दिला आहे किंवा जी माहिती दिल्याने न्यायालयाचा अवमान होईल.
 • अशी माहिती जी उघड केल्याने संसद किंवा विधीमंडळाच्या स्वातंत्र्याला बाधा येईल.
 • व्यावसायिक गोपनीयता, व्यापारी गुपिते किंवा बुद्धीजीवी मालमत्ता यांचा समावेश, असणारी माहिती जी उघड केल्याने तिसऱ्या पक्षाच्या स्पर्धात्मक स्थानाला धक्का पोहोचू शकतो. अर्थात सदर माहिती उघड करण्यास प्रतिस्पर्धी पक्षाची हरकत नसल्यास ही माहिती उघड केली जाऊ शकते.
 • एखाद्या व्यक्तीच्या विश्वसनीय नात्यांमधुन मिळालेली माहिती. मात्र माहिती उघड करण्यास प्रतिस्पर्धी पक्षाची हरकत नसल्यास ही माहिती उघड केली जाऊ शकते.
 • परराष्ट्र सरकारकडून मिळवलेली माहिती. जी माहिती उघड केल्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो अथवा ज्यामुळे एखाद्या कायद्याची अंमलबजावणी करण्यास गुप्तपणे मदत करणाऱ्या व्यक्तीवे नाव उघड होऊ शकते किंवा सुरक्षेच्या कारणांस्तव असलेली माहिती.
 • अशी माहिती कि ज्यामुळे शोधकाऱ्यात किंवा आरोपींवरील कारवाईत अडथळा निर्माण होऊ शकतो.
 • मंत्रीमंडळ, सचिव आणि इतर अधिकारी यांच्यात होणाऱ्या चर्चेचे तपशील व इतर कॅबिनेट कागदपत्रे.
 • अशी माहिती जिचा सामाजिक कार्याशी अथवा जनहिताशी काहीही संबंध नाही अशी वैयक्तीक माहिती किंवा जी उघड केल्याने एखाद्या व्यक्तीच्या एकांताचा भंग होऊ शकतो किंवा त्याच्या खाजगी आयुष्यावर आक्रमण होऊ शकते अशी कोणतीही माहिती.
 • मात्र एखाद्या घटनेत व्यक्तीला अथवा पक्षाला होणारा त्रास जनहिताच्या तुलनेत कमी महत्त्वाचा असेल तर अशी माहिती उघड केली जाऊ शकते.


अर्ज कसा करावा?
जनमाहिती अधिकाऱ्याकडे इंग्लिश, हिंदी किंवा त्या राज्याच्या अधिकृत भाषेत लेखी किंवा ईलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे आपल्याला हव्या असलेल्या माहितीचा तपशील असणारा अर्ज सादर करावा.

 • माहिती मिळवण्या मागील कारण स्पष्ट करणे अर्जदारावर बंधनकारक नाही.
 • ठरवून दिलेली फी भरावी.


माहिती मिळवण्यासाठी काही खर्च येतो का ?

होय, माहितीसाठीच्या कागदपत्रांचा खर्च पुढील प्रमाणे येतो. मात्र अर्जदार दारिद्र्यरेषेखालील असेल तर- खर्च लागत नाही. कागदपत्रांचा खर्च :-


दस्तावेजाचे वर्णन खर्च
विविध कागदपत्रांची झेरॉक्स
एका पानास रु. २
आवश्यक माहितीची सीडी किंवा फ्लॉपी
प्रत्येकी ५० रु.
कार्यालयातील कागदपत्रे पहायची असल्यास पहिल्या तासासाठी खर्च नाही.
तासाभरापेक्षा अधिक वेळ पहायची असल्यास
प्रत्येक तासासाठी ५ रु.
आवश्यक माहिती पोस्टाने हवी असल्यास
पोस्टाचा खर्च द्यावा लागतो.


अर्जदार या फीचे पुर्नतपासणी करण्यासाठी योग्य त्या समितीकडे अपील करू शकतो. जर जनमाहिती अधिकारी ठरवून दिलेल्या वेळेत माहिती देण्यास अयशस्वी ठरल्यास त्याने ती माहिती अर्जदारास विनामुल्य देणे बंधनकारक आहे.


अर्जदाराने अपील कसे करावे?
अर्जदाराने मागितलेली माहिती अपूर्ण, चुकीची, दिशाभूल करणारी असेल किंवा माहिती नाकारल्यास संबंधित अर्जदारास जनमाहिती अधिकार्‍याविरुद्ध अपिलीय अधिकार्‍यांकडे अपील करता येते. हे अपील ३० दिवसांच्या आत करता येते. हा अपिलीय अधिकारी जनमाहिती अधिकार्‍यापेक्षा अधिक अनुभवी असणारा, कामाच्या सर्व बाबी माहिती असलेला असतो. त्याने अनुभवाचा व अधिकाराचा वापर नि:पक्षपातीपणे करावयाचा असतो. अपील असे करावे :

 • अपिलासाठी अर्ज सादर करताना कागदावर २० रुपयांचा न्यायालय मुद्रांक चिकटवावा.
 • अर्जावर नांव, पत्ता, जनमाहिती अधिकार्‍याचा तपशील द्यावा. त्यात कोणती अपेक्षित माहिती मिळाली नाही याचा उल्लेख करावा. एकूणच तक्रारीचे स्वरुप/अपिलाचे कारण स्पष्टपणे लिहावे.
 • शेवटी सही करुन अर्ज दाखल करावा.
 • अर्जाची पोच घ्यावी.
 • अपिलीय अधिकार्‍याकडे अपील दाखल केल्यावर अर्ज केल्याच्या दिनांकापासून ४५ दिवसांच्या आत माहिती मिळू शकते.


दुसरे अपील कसे करावे ?

अर्जदाराने मागितलेली माहिती अपिलीय अधिकार्‍याकडूनही न मिळाल्यास किंवा चुकीची, अर्धवट मिळाल्यास, समाधान न झाल्यास अर्जदार हा दुसरे अपील राज्य माहिती आयुक्तांकडे ९० दिवसाच्या आत करु शकतो. दुसरे अपील असे करावे :

 • अपिलासाठी अर्ज सादर करताना कागदावर २० रुपयांचा न्यायालय मुद्रांक चिकटवावा.
 • अर्जावर नांव, पत्ता, जनमाहिती अधिकार्‍याचा तपशील द्यावा. त्यात कोणती अपेक्षित माहिती मिळाली नाही याचा उल्लेख करावा. एकूणच तक्रारीचे स्वरुप/अपिलाचे कारण स्पष्टपणे लिहावे.
 • शेवटी सही करुन अर्ज दाखल करावा.
 • अर्जाची पोच घ्यावी.माहितीचा अधिनियम अंतर्गत विभाग निहाय माहिती


​​माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अन्वये माहिती मिळविण्यासाठीच्या अर्जाचा नमुना -