कामाचे स्वरूप 
१) १९८१- २००१ रस्ते विकास आराखडयानुसार ग्रामीण भागातील रस्त्यांची सुधारणा करणे.
२) शासकिय निधी कामावर खर्च करतांना उपलब्ध निधीनुसार खर्चावर नियंत्रण ठेवणे.
३) रस्त्यांचे डांबरीकरण, खडीकरण व मजबुतीकरण करणे, छोटया मोरया बांधणे, शाळाखोल्या बांधणे व किरकोळ स्वरूपाच्या दुरूस्तीची कामे करणे.
४) कामावर देखरेख करून कामे तांत्रिकदृष्टया योग्य होतात किंवा नाही ते पाहुन त्यांना तांत्रिक दृष्टया मार्गदर्शन करणे.
५) उप अभियंता यांचेकडून विविध योजनेची व विविध स्तरावरील कामे करून घेणे.
६) शासनाच्या विविध योजना शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार राबविणे व तांत्रिक मान्यता देणे.
७) कामे प्रगतीपथावर राहणेसाठी योग्य ती उपाय योजना करणे, ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करणे.
८) मुख्यालयातील दुरूस्ती व देखभाल- नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत येणारया इमारतींची देखभाल व दुरूस्ती उपविभागामार्फत केली जाते. त्यामध्ये पाणीपुरवठा, मालमत्ता कर इत्यादी बाबतचा समावेश आहे.

व्याप्तीः- रस्ते व इमारतीची विविध प्रकारची कामे विविध योजने अंतर्गत वेगवेगळया खर्चाच्या सदरात या विभागामार्फत केली जातात. बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये खालील ६ तालुक्याचा समावेश होतो.
अ.क्र. तालुका
१ नंदुरबार
२ नवापूर
३ शहादा
४ तळोदा
५ अक्कलकुवा
६ धडगांव
वरील ६ तालुक्यांमध्ये बांधकामाचे ६ उपविभाग कार्यरत असुन त्यावर ६ उप अभियंता व त्यांचे अधिनस्त शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता व इतर आवश्यक कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. रस्ते विकास योजने अंतर्गत वरील ६ तालुक्यातील खालीलप्रमाणे कि.मी. लांबीचे इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गाचे रस्ते या विभागाच्या ताब्यात आहेत.
अ.क्र. तालुका इजिमा ग्रामा एकूण
१. नंदुरबार १८६.७० ४२२.४२ ६०९.१२
२. नवापूर १२१.४७ ४३२.७० ५५४.१७
३. शहादा १३९.९० ३५२.७० ४९२.६०
४. तळोदा ४७.८५ २२२.४५ २७०.३०
५. अक्कलकुवा ५१.२० ३५९.१५ ४१०.३५
६. धडगांव १२५.०५ २६६.५० ३९१.५५
एकूण ६७२.१७ २०५५.९२ २७२८.०९
वरील रस्त्यांची नविन कामे, दुरूस्त्या व देखभालीचा कार्यक्रम हा शासन व जि.प.अनुदान व लोकप्रतिनिधींची मागणी व महत्वाचे एस.टी.मार्ग व मालवाहतूकीचे रस्ते इ. वर अवलंबून असतो.
योजनांतर्गत कामेः-
१. ग्रामीण रस्ते विकास व मजबूतीकरण (आदीवासी /बिगरआदीवासी)
२. योजनेत्तर कार्यक्रम
३. तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रम
४. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ
५. ८ सार्वजनिक आरोग्य बांधकामे
६. १३ वा वित्त आयो्ग
७. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना
८. मुख्यालयातील दुरूस्ती व देखभाल
९. जि.प. सेस रस्ते दुरूस्ती कार्यक्रम
१०. BRGF अंतर्गत कामे
योजना व माहीती
३०५४ मार्ग व पूल रस्ते विशेष दुरूस्ती सदर योजने अंतर्गत ग्रामीण भागातील अस्तित्वातीलरस्त्यांचे परिरक्षण व दुरूस्तीची कामे हाती घेतली जातात.
योजनेचे ध्येय धोरण - अस्तित्वातील रस्त्यांवरील वाहतूक व दळणवळण सुस्थितीत राहणेसाठी नियतकालीक दुरूस्तीची व नुतनीकरणाची आवश्यकता असते. त्यानुसार त्या रस्त्यांचे परिरक्षण व दुरूस्तीसाठी शासनाकडुन निधी उपलब्ध होतो. अस्तित्वातील डांबरी, खडीचे व मुरूमी रस्त्यांचे देखभाल व दुरूस्ती करून रस्ते वाहतूकीस सुस्थितीत ठेवणे हे याचे प्रमुख उद्दिष्ठ आहे. ​रस्ते दुरूस्तीची गट निहाय सविस्तर माहीती खालीलप्रमाणे आहे.
गट अ (सर्वसाधारण दुरूस्ती) - ज्या रस्त्यांसाठी सर्वसाधारण दुरूस्ती आवश्यक आहे. उदा. खडीचा/ डांबरी पृष्ठभागास खड्डे पडलेले आहेस, मोरयाचे हेडवॅाल, भरावाची दुरूस्ती आवश्यक आहे, बाजु पट्टया खचलेल्या आहेत. अशा प्रकारची दुरूस्तीची कामे सर्वसाधारण दुरूस्ती अंतर्गत हाती घेणेत येतात. सदरच्या कामास अधीक्षक अभियंता यांचेकडुन मान्यता प्राप्त होते.
गट ब – सदर योजनेंतर्गत रस्त्यांची विशेष दुरूस्ती (ब-१०), डांबराने नुतनीकरण करणे (ब-११), खडीने नुतनीकरण करणे (ब-१४) अशा उपशीर्षांतर्गत कामे हाती घेणेत येतात. खडीचे रस्ते असल्यास पिक अॅन्ड रोल करून नुतनीकरण करणे, डांबरी पृष्ठभाग असल्यास रस्त्यावरील खड्डे बी.बी.एम.ने भरून डांबरीकरणाने नुतनीकरण करणे आवश्यक असते.
​गट क – उपशीर्षांतर्गत मोरयांची कामे व मुरूमी रस्त्यांचे खडीकरण करणेची कामे हाती घेणेत येतात. रस्त्यावरील मोरया, लहान पूल इ. पाहणी करून आवश्यकतेनुसार नवीन मोरी बांधणे, मोरयांची दुरूस्ती तसेच मुरूमी रस्त्यांचे खडीकरण करणे या प्रकारची कामे हाती घेतली जातात. सदर कामास शासन स्तरावर मंजूरी प्राप्त होते.
गट इ - ज्या रस्त्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान होते अशा रस्त्यांचे सर्वेक्षण करून पूरहानी कार्यक्रमांतर्गत तातडीने दुरूस्ती करणेची कामे हाती घेतली जातात.

जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना
सदर लेखाशिर्षांतर्गत आदीवासी क्षेत्रातील रस्त्यांची खडीकरणाची व डांबरीकरणाची तसेच त्यावरील पुल व मोरयांची कामे घेतली जातात. सदर कामे मा. लोकप्रतिनिधी मार्फत सुचविणेत येत असून या कामांना जिल्हा नियोजन समितीमार्फत शासनाकडुन अर्थसंकल्पीत करून मंजूर करण्यात येतात. सदरच्या कामांना सार्वजनिक बांधकाम मंडळ व जिल्हा नियोजन समिती यांचेकडून निधी प्राप्त होतो. निधीच्या निकषाच्या अधिन राहुन कामे हाती घेण्यात येतात.

जिल्हा वार्षिंक बिगर आदिवासी योजना
सदर लेखाशिर्षांतर्गत बिगर आदिवासी क्षेत्रातील रस्त्यांची खडीकरणाची व डांबरीकरणाची तसेच त्यावरील पुल व मोरयांची कामे घेतली जातात. सदर कामे मा. लोकप्रतिनिधी मार्फत सुचविणेत येत असून या कामांना जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर करण्यात येतात. सदरच्या कामांना जिल्हा नियोजन समिती यांचेकडून निधी प्राप्त होतो. निधीच्या निकषाच्या अधिन राहुन कामे हाती घेण्यात येतात.

आमदार / खासदार / डोंगरी विकास कार्यक्रम
योजनेचे ध्येय धोरण – ग्रामीण भागात शाळागृहे, समाजमंदीर, चावडी इमारती, रस्ते, स्मशानभूमी, सांस्कृतिक भवन, वॅाल कंपाऊड इत्यादी बांधकामे करून ग्रामीण जनतेसाठी नागरी सुविधा / शैक्षणिक सुविधा पुरवुन विकास करणे. योजना राबविण्याची पध्दत – आमदारांचा स्थानिक विकीस कार्यक्रम / खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम व डोंगरी विकास कार्यक्रम अंतर्गत मा. विधानसभा / विधानपरिषद सदस्य, मा.खासदार व लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदार संघातील कामे सुचविलेनंतर कार्यकारी अभियंता यांचे कार्यालयामार्फत सविस्तर अंदाजपत्रक मा. जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करणेत येतात. मा. जिल्हाधिकारी यांचेकडून प्रशासकिय मान्यता प्राप्त झाले नंतर कार्यकारी अभियंता सदर कामास तांत्रीक मान्यता देऊन निविदेची कार्यवाही करतात. तदनंतर नियोजन शाखेकडून अनुदान प्राप्त करून घेऊन कामे विहित मुदतीत पूर्ण करणेत येतात. सदर लेखाशिर्षांतर्गत ग्रामीण भागात शाळागृहे, समाजमंदिर, चावडी इमारती, रस्ते, स्मशानभूमी, सांस्कृतिक भवन, वॅा कंपाऊड इत्यादी बांधकामे केली जातात.

नाशिक विकास पॅकेज वाडी जोड कार्यक्रम सदर लेखाशिर्षांतर्गत जिल्हा नियोजन समिती मार्फत बिगर आदिवासी क्षेत्रातील कार्यक्रम मंजूर आहे व आदिवासी क्षेत्रासाठी प्रस्तावित आहे.

१३ वा वित्त आयोग जि.प.स्तर ही केंद्र शासनाची राज्यस्तर योजना असून या योजने अंतर्गत केंद्र शासनाने निधी उपलब्ध करून दिल्यानंतर सदरचे अनुदान हे जिल्हा परिषद स्तरावरून पंचायत समिती, ग्रामपंचायत यांना शासनाच्या निर्देशाप्रमाणे अनुदान वाटप करणेत येते. योजनेंतर्गत लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य हे आवश्यकतेनुसार इजिमा रस्ता दुरूस्ती, दहनभुमी सुधारणा करणे इ. कामांची शिफारस करतात. त्यानंतर जि.प.सर्वसाधारण सभा सदर कामाच्या निवडीस मान्यता देते. त्यानंतर सदर कामांना प्रशासकिय मान्यता देणेत येते. सदर कामाची निविदा निश्चिती करून कामाचे कार्यारंभ आदेश दिले जातात. हि योजना त्रिस्तरीय राबविली जाते.
अ) जिल्हा परिषद
ब) पंचायत समिती
क) ग्रामपंचायत


१३ वा वित्त आयोग राज्य स्तर ही केंद्र शासनाची राज्यस्तर योजना असून सदर योजने अंतर्गत सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत मुख्य दळणवळणाच्या रस्त्यांची डांबरीकरणाची कामे केली जातात.

तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रम / क वर्गीय पर्यटन स्थळ योजनेचे

योजना राबविणेची पध्दत – लोकप्रतिनिधी सुचविलेल्या तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी वर्षभरात एक लक्ष भाविक येणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेसाठी सादर करणेत येतो. सदर प्रस्तावास जिल्हा नियोजन समितीची मंजूरी मिळालेनंतर सविस्तर अंदाजपत्रक तयार करून जिल्हा नियोजन समिती मार्फत निधी उपलब्ध होतो. निधीच्या उपलब्धतेनुसारया योजनेंतर्गत ग्रामीण भागातील तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भक्त निवास बांधणे, संरक्षण भिंत, वाहनतळ बांधणे इ. कामे हाती घेण्यात येतात. या विभागाच्या कार्यक्षेत्रात खालीलप्रमाणे तिर्थक्षेत्रे / यात्रास्थळे / धार्मिक स्थळे घोषित केलेली आहेत.
नंदुरबार तालुका - शनिमांडळ, (शनिदेव मंदिर) तिर्थक्षेत्र, कोरीट, पावला, शिंदे, नाशिंदे, काळंबदेव, नारायणपूर, वसलाई, कोळदे, धानोरा, पिंपळोद, उमज(मोठे), नटावद, शिंदगव्हाण, गुजरभवाली, वेळावद, काकर्दे, मांजरे, धमडाई, उमर्देखु., गंगापुर, हाटमोहिदा, विखरण, ठाणेपाडा, बलदाणे, कार्ली.
नवापूर तालुका - धनराट, बिजगांव, आमझरपाडा, सागाळी, हरणीपाडा, भादवड, मेंहदीपाडा, वडदा, बोरझर, उकळापाणी, बर्डीपाडा, वासरवेल धनराट, करंजाळी, खडकी, मोतीझिरा, चौकी, तीनटेंभा, खांडबारा, वडफळी, शिवागढी, विसरवाडी, शिर्वे, देवलीपाडा (धायटे), तारपाडा, खळीबर्डी, कोठडा.
शहादा तालुका - सारंगखेडा, प्रकाशा, मंदाणे, जयनगर, म्हसावद, खेडकोचरा, उंटावद, पिंगाणे, टवळाई, न्यु टेंभे, धुरखेडा, लांबोळा, शेल्टी, तोरखेडा, कहाटूळ, असलोद, वडाळी, ससदे, जवखेडा.
तळोदा तालुका - इच्छागव्हाण, कुडवे, वाल्हेरी, हाडंबादेवी, बोरद, शिर्वे, बुधावल.
अक्कलकुवा तालुका - अक्कलकुवा, मणीबेली, डाब, कोंढवा, काजीघाट, मोरखी, दहेल, बाबा हिदजा देवस्थान.
अक्राणी तालुका - अस्तंभा, तोरणमाळ, उनपदेव, देवटुका(पौला)


२२१० सार्वजनिक आरोग्य योजनेचे
ध्येय व धोरण- ग्रामीण भागातील जनतेस आरोग्य सुविधा वेळीच उपलब्ध होणे. सदरच्या योजने अंतर्गत जिल्हा परिषद स्तरावर आरोग्य इमारती, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, वैदयकिय अधिकारी / कर्मचारी निवासस्थाने बांधकामे, अंतर्गत रस्ते तयार करणे, आवारभिंतीचे बांधकाम करणे इ. बांधकामे व देखभाल दुरूस्तीची कामे घेतली जातात.

उर्वरितमहाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ सदरच्या निधातून गावांना जोडणारे रस्त्यांची कामे हाती घेणेत येतात.
योजनेचे ध्येय व धोरण – विविध विकास क्षेत्रामध्ये आपापल्या क्षेत्राच्या विकासाची पातळी निश्चित करणे तसेच अनुशेष दूर करण्याच्या दृष्टीने विविध विकास कामाचे परिणामांचे मुल्यमापन करणे.
योजना राब���िण्याची पध्दत – सदर कार्यक्रमांतर्गत मा. आमदार / लोकप्रतिनिधीनी सुचविलेल्या कामांची अंदाजपत्रके तयार करून सदर कामाला उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ यांचेकडून मंजुरी घेऊन जिल्हा परिषदेमार्फत प्रशासकिय मान्यतेची कार्यवाही करणेत येते व निधी प्राप्त झालेनंतर निविदेची कार्यवाही करणेत येते.

जिल्हा परिषद निधी या निधीतून रस्ते तयार करणे व दुरूस्ती करणेची कामे हाती घेण्यात येतात. योजना राबविणेची पध्दत- यासाठी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करणेत येते. त्यानुसार प्रशासकिय मान्यता व तांत्रिक मान्यता देऊन निविदा पध्दतीने कामे पूर्ण करून घेणेत येतात.

ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा कार्यक्रम योजनेचे
ध्येय व धोरण- आदिवासी वस्तीमध्ये मुलभुत सुविधा पुरविणे. योजना राबविणेची पध्दत- सदरचा कार्यक्रम आदिवासी विभागाकडून मंजूर केला जातो. सदर कार्यक्रमांतर्गत आदिवासी जोडवस्ती रस्ते काँक्रीटीकरण करणे, डांबरीकरण करणे, सभागृह बांधणे, पाणीपुरवठयाची कामे करणे इ. कामे या योजनेतून केली जातात

.

१. खात्याची रचना, कामाचे स्वरूप, व्याप्ती- खात्याची रचना 

Work Department

बांधकाम विभाग 

Nandurbar Zilla Parishad